श्रावण विशेष : सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर | पुढारी

श्रावण विशेष : सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

 

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग. श्रावण सोमवारी येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे पवित्र स्वयंभू ज्योर्तिर्लिंग म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे प्राचीन काळापासून हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहे. येथे भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासून झाली असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे भीमेचे उगमस्थानच येथे आहे. पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन आल्यावर कळमजाई मातेचे मंदिर आहे. तेथील दर्शन घेतल्यानंतरच पूर्ण दर्शन होते अशी आख्यायिका आहे.

श्रीमंत पेशव्याचे दिवाणजी नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. सावकार चिमणाजी अतांजी नाई-भिडे यांनी इ.स. १४३७ मध्ये मंदिराचा सभामंडप बांधला. जवळच एक मोठी घंटा बांधलेली असून तिचे वजन पाच मण आहे. तिच्यावर १७२१असे कोरलेले आहे. तिच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. सह्याद्रीच्या पर्वतरांगात घनदाट झाडीत मंदिर परिसर व जंगलात वन्यजीव प्राणी, पक्षी व किटके आढळतात. अलिकडील काळात शेखरुचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. येथील अभयारण्य हे १३०.७८ चौरस किलोमिटर आहे. तर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४ हजार फूट उंचीवर आहे. यामुळे येथे थंड हवा, व पावसाळ्यात जोरदार पाऊस, दाट धुके असा निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर पहायला मिळतो.

भीमाशंकरमधील महाशिवरात्री उत्सव आणि श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकरचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने पुर्ण एक महिना दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. पर्यटक व निसर्गप्रेमी भीमाशंकर अभयारण्य, हनुमानतळे, नागफणी, मुंबई पाँईट, डिंभे धरण, कोंढवळ व पोखरी घाटातील धबधबे आदी परिसरामध्ये निसर्गाचा मनमोहक आनंद व देवदर्शन असा दुहेरी लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात.

 हे ही वाचा :

 

Back to top button