पिंपरी : पत्नीला त्रास देेण्यार्‍यास मारहाण | पुढारी

पिंपरी : पत्नीला त्रास देेण्यार्‍यास मारहाण

पिंपरी : पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री उत्तमनगर, बावधन येथे घडली. सुनील धर्मा पवार (30, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल शिवाजी बळवंते (वय 30), आदिनाथ शिवाजी बळवंते (35, दोघे रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची बहीण गुरुवारी रात्री दुचाकीवरून जात होते.

दरम्यान, उत्तमनगर येथे बांदल इस्टेट येथे आल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवले. आरोपी आदिनाथ याने फिर्यादी यांना, तू माझ्या बायकोला त्रास का देतो, असे म्हणत शिवीगाळ व धमकी दिली. त्यांनतर फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. तसेच, फिर्यादी यांच्या बहिणीच्या पायावर दांडक्याने मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button