पिंपरी : कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दि. 12 जून सकाळी पवळे उड्डाण पुलावर, निगडी येथे घडली. विजय गुलाब सरोदे (42, रा. शिरगाव) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रामचंद्र कांबळे (45, रा. देहूरोड) यांनी गुरुवार (दि.11) रोजी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी आणि त्यांच्या मेहुणीचा मुलगा विजय सरोदे दुचाकीवरून 12 जून रोजी सकाळी शिरगाव येथून शिवाजीनगरला जात होते. दरम्यान, पवळे उड्डाण पुलावर कारने विजय यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, 16 जून रोजी विजय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button