भवानीनगरला चप्पलचे दुकान फोडले | पुढारी

भवानीनगरला चप्पलचे दुकान फोडले

भवानीनगर : येथील व्यापारपेठेत चोरट्यांनी शुक्रवारी (दि. 13) रात्री लिंबराज शू मार्ट या चप्पल दुकानाचा छतावरील पत्रा काढून रोख रकमेसह सुमारे पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. नीलेश सोनवणे यांचे लिंबराज शू मार्ट हे चप्पलचे दुकान असून, या दुकानात चोरट्यांनी रात्री छतावरील पत्रा काढून प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील दहा हजार चारशे रुपये रोख रक्कम व चार ते पाच चपलांचे जोड चोरून नेले. याबाबत सोनवणे यांनी भवानीनगर पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे.

Back to top button