नसरापूर : गुंजवणी खोर्‍यात घराघरांवर तिरंगा | पुढारी

नसरापूर : गुंजवणी खोर्‍यात घराघरांवर तिरंगा

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. सध्या शेतातील पेरणीची कामे चालू असतानादेखील या अभियानाला शनिवारी गुंजवणी, शिवगंगा खोरे, तसेच महामार्ग परिसरातील गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरात घराघरांसह शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आले. मात्र, याच काळात कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज सूर्योदयावेळी फडकवल्यानंतर दररोज सूर्यास्तावेळी उतरवावा, अशी सूचना शासकीय स्तरावरून प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र, घरोघरी तिरंगा फडकविण्यात आलेला तिरंगा येत्या 15 ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नसरापूर, कामथडी, माळेगाव, निधान सांगवी, खडकी, हातवे, तांभाड, भिलारेवाडी, मोहरी, कासुर्डी, शिवरे, वरवे, केळवडे, साळवडे, कांजळे आदी गावामध्ये नागरिकांनी स्वच्छेने आपापल्या घराघरांवर तिरंगा ध्वज फडकाविला आहे. देशाप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तीतून तिरंगा फडकाविण्यात आल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

 

Back to top button