पिंपरी :शहरात कोरोनाचे नवे 55 रुग्ण | पुढारी

पिंपरी :शहरात कोरोनाचे नवे 55 रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे शुक्रवारी (दि.12) दिवसभरात 55 बाधित रुग्ण आढळले. तर, 118 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 25 सक्रिय रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर 542 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरु आहे. शहरात शुक्रवारी दिवसभरात 349 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली.

617 जणांना शुक्रवारी कोरोना लसीकरण करण्यात आले. शहरात आज अखेर एकूण 3 लाख 68 हजार 789 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 3 लाख 64 हजार 326 रुग्ण बरे झाले. तर, आजपर्यंत 4 हजार 627 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button