येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचार्‍याचा स्वच्छतागृहात मृत्यू

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचार्‍याचा स्वच्छतागृहात मृत्यू
Published on
Updated on

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्‍याचा स्वच्छतागृहातच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अनिल मोरे (वय 52, रा. हडपसर) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. मोरे हे पेन्शन क्लास म्हणून काम पाहत होते. शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या वेळी ते दुसर्‍या मजल्यावरील स्वच्छतागृहात शौचालयासाठी गेले होते. त्यानंतर, कार्यालयातील एक कर्मचारी स्वच्छतागृहात गेला असता त्याला दरवाजा मधून पाय बाहेर आल्याचे दिसले. ही बाब त्यांनी कार्यालयातील इतर कर्मचारी यांना सांगितल्यानंतर कर्मचार्‍यांच्या वतीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने याबाबत येरवडा पोलिस ठाणे व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला असता मोरे हे निपचित पडल्याचे दिसून आले. मोरे यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अधीक्षक अभियंता भवारी म्हणाले, 'मोरे यांच्यावर ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार असून, डॉक्टरांच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.' या घटनेमुळे येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news