पुणे : कौशल्ये मिळवलेल्या पदवीधरांना मागणी; ‘हार्वर्ड’चे श्रीकांत दातार यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : कौशल्ये मिळवलेल्या पदवीधरांना मागणी; ‘हार्वर्ड’चे श्रीकांत दातार यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्लाउड, 5 जी टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या सर्व संस्था अतिशय मूलभूत मार्गांनी बदलत आहेत. संस्था ज्ञानी आणि गंभीर निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या या कौशल्यांचे ज्ञान असलेल्या पदवीधरांची मागणी करतील,’ असे प्रतिपादन हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रमुख श्रीकांत दातार यांनी केले. मराठी विश्व न्यू जर्सी आणि बृहन् महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने बीएमएम 2022 आंतरराष्ट्रीय अधिवेशन अटलांटिक सिटी न्यू जर्सी येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेला ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर उपस्थित होते.

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही या परिषदेत ऑनलाइन विचार मांडले. पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. 5000 अनिवासी मराठी (अमेरिका, कॅनडास्थित) यात सहभागी झाले आहेत. अनेक सांस्कृतिक, सांगीतिक मैफली, बिझनेस एक्स्पो, एजुकेशन कॉन्क्लेव्ह, वैयक्तिक गाठीभेटी असे अनेक कार्यक्रम या अधिवेशनात होणार आहेत. व्यवसायवृद्धी हे या अधिवेशनाचे खास आकर्षण आहे. ही परिषद म्हणजे मराठी व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी थेट भेटीगाठीच्या संधी, उद्योजकीय कल्पना, गुंतवणूकदार, मार्गदर्शक, तंत्रज्ञान भागीदार यांच्यासाठी एक अनोखे व्यासपीठ आहे.

डॉ. शिकारपूर म्हणाले, ‘आपण जगात बदल घडवणार्‍या नेत्यांना शिक्षित करण्यासाठी संबोधित केले पाहिजे. पुढील काही वर्षांसाठी एक अतिशय धाडसी आणि महत्त्वाकांक्षी विचार मांडू. महिला उद्योजकांचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात चार महिला होत्या. स्थानिक मराठी उद्योजक व पुण्यातील सुप्रिया बडवे यांनी वीस वर्षात 5 हजार कोटी उलाढालीचा व्यवसाय बनवला. मराठी उद्योजक फक्त सिलिकॉन व्हॅलीतच यशस्वी होतात असे नाही, तर ते सह्याद्री व्हॅलीतही यश मिळवू शकतात. ‘मराठी माणूस तुम्ही महाराष्ट्रातून बाहेर काढू शकता; पण त्याचे मराठीपण तुम्ही हिरावू शकत नाही.’

Back to top button