पुणे : यशवंत कारखान्याच्या प्रशासकांचा राजीनामा; राज्य बँकेकडून लेखापरीक्षण, मालमत्तेचा ताबाच नसल्याने निर्णय | पुढारी

पुणे : यशवंत कारखान्याच्या प्रशासकांचा राजीनामा; राज्य बँकेकडून लेखापरीक्षण, मालमत्तेचा ताबाच नसल्याने निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: थेऊर येथील बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर नियुक्त प्रशासक व सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी आपल्या प्रशासक पदाची नियुक्ती रद्द करण्याचा अर्ज शुक्रवारी (दि.12) पुणे प्रादेशिक साखर
सहसंचालकांना दिला. 2 एप्रिल 2011 रोजी कारखान्याची व्यवस्थापन समिती बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती.

तसेच कारखाना अवसायनात काढण्याच्या पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या आदेशावर काही ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर कारखाना बंद राहिल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान अवसायकाच्या निष्क्रियतेमुळे झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

यशवंत कारखान्याच्या विषयांवर वारंवार पाठपुरावा करूनही राज्य बँकेचे कारखान्यावर असलेले अवसायक सतीश साळुंके यांनी कारखान्याचे दप्तर दिले नाही. लेखापरीक्षणही पूर्ण केले नाही. याबाबत आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही राज्य बँकेने काहीच केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कारखान्याचे प्रशासक बी.टी. लावंड यांनी प्रशासक पदाची नियुक्ती रद्द करण्याची लेखी विनंती केली असून, त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. या प्रकरणी उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.

                                       – धनंजय डोईफोडे, प्रादेशिक साखर सह संचालक, पुणे.

Back to top button