पुणे : अपक्ष आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान | पुढारी

पुणे : अपक्ष आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान

पुणे : पुढारी वृत्तसेवा आमच्याकडे दोन अपक्ष मंत्री होते. त्यातील एकालाच मंत्रिमंडळात स्थान दिले असते, तर वेगळा संदेश गेला असता. बच्चू कडू हे एक अपक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसर्‍या टप्प्यात ठेवला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्‍ते आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

केसरकर शुक्रवारी पुणे दौर्‍यावर होते. त्या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हा आरोप कित्येक महिन्यांपूर्वी केला गेला होता. जी चौकशी झाली, त्यात राठोड कुठेही दोषी आढळलेले नाहीत. त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवलेले नाही. महिलांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आमचीही भावना आहे. चित्रा वाघ म्हणतात, या प्रकरणात अधिक चौकशी झाली पाहिजे, असे म्हणत असतील तर ती चौकशीही होईल.

आमच्यातील 15-20 लोक परत येणार, असे म्हटले जात होते. परंतु प्रत्यक्षात आम्ही जेव्हा आलो, तेव्हा त्यांच्यात असलेल्यांपैकीच एक कमी झाला आणि आम्ही एकत्र राहिलो, तर आणखी कितीतरी लोक कमी होणार आहेत, असे ते म्हणाले. ‘उठाव करायला एक धैर्य लागते. प्रसंगी ते धैर्य ते दाखवू शकले नाहीत. नाहीतर एक-दोन वगळता सगळेच्या सगळे आमदार या उठावात सहभागी झाले असते, याची मला खात्री आहे, असा विश्‍वासही केसरकर यांनी व्यक्‍त केला.

Back to top button