पुणे : अमृता फडणवीस यांना उद्देशून आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यास अटक

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना उद्देशून अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. अमित सुदाम वायकर (रा. कावळेमळा, चाळकवाडी पिंपळवंडी, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया देताना सावधानता बाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार

एका दैनिकाच्या फेसबुक पेजवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील सभेत खरी शिवसेना आमच्या सोबतच असल्याची बातमी प्रसारित केली होती. यावर प्रतिक्रिया देताना अमित वायकर यांने फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना उद्देशून आक्षेपार्ह कमेंट केली. त्यामुळे भाजपच्या आशाताई दत्तात्रय बुचके यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अमित वायकर याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत अश्लील व खालच्या दर्जाची हीनभाषा वापरून विनयभंग करण्याचे उद्देशाने कृती करून, कमेंट करत ती समाज माध्यमावर प्रसिद्ध केली. तसेच आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी आशाताई बुचके यांनी फिर्यादीतून केली होती.

जाणून घ्या, कोण आहे ही सौदीची महिला ज्यांचे कौतुक करताना भारतीय थकत नाहीत

या प्रकरणाची दखल घेत आळेफाटा पोलिसांनी आरोपी अमित वायकर याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ५०९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६७ नुसार गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करत आहे.

MHA Awards : महाराष्ट्राच्या 11 पोलीस कर्मचार्‍यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’!

Exit mobile version