उजनी धरण १०० टक्के भरले! | पुढारी

उजनी धरण १०० टक्के भरले!

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणाने सध्या १०० टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून, धरणात १०१.४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये एकूण पाणीसाठा ११८.०१ टीएमसी झाला असून, शुक्रवारी (दि. १२) उजनी धरणातून नदीपात्राच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.

उजनी धरणाचे १६ दरवाजातून ३० हजार क्युसेकने भीमा नदीपत्रात पाणी सोडण्यात आले आहे. हा विसर्ग गुरुवारी रात्री टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. उजनीत सध्या दौंडमधून ६० हजार ३४१ क्युसेकने पाणी येत आहे. तसेच बंडगार्डनवरून २३ हजार ६१४ क्यूसेक विसर्ग येत आहे. यामुळे उजनी धरणातून अजून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना अधिक सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती, औद्योगिकीकरण प्रश्न मिटल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी खालीलप्रमाणे

  • एकूण पाणीपातळी : ४९६.८९५ मी.
  • एकूण पाणीसाठा : ११८.०१ टीएमसी
  • उपयुक्त पाणीसाठा : ५४.३५ टीएमसी
  • टक्केवारी : १०१.४५ %

विसर्ग

  • दौंड विसर्ग : ६०३४१ क्यूसेक
  • बंडगार्डन विसर्ग : २३६१३ क्यूसेक
  • सिना माढा बोगदा : २५९ क्यूसेक
  • दहीगाव उपसा सिंचन : ४३ क्यूसेक
  • मुख्य कालवा : २००० क्यूसेक
  • विजनिर्मिती : १६०० क्यूसेक
  • बोगदा : ८०० क्यूसेक

Back to top button