तपस्येने जोडला नात्यातील गोडवा | पुढारी

तपस्येने जोडला नात्यातील गोडवा

भोसरी (संजयकुमार बोरा) : भारतीय संस्कृतीमधील पवित्र चातुर्मास सुरू झाला आहे. हिंदू धर्मातील व्रत वैकल्ये, जैन धर्मातील तप आराधना सुरू आहे. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ भोसरीच्या जैन स्थानक भवनात यावर्षी ज्ञानवतीजी महाराज साहेब यांच्या शिष्या दिवाकर रत्न सुशीलजी महाराज व मधुरकंठी साध्वी श्रध्दाजी महाराज यांचा चातुर्मास अत्यंत उत्साहात सुरू आहे.

तपआराधना उत्सवाची सुरुवात श्राविका सौ. शितल महेंद्रजी फिरोदिया यांच्या नऊ उपवासांची सांगता श्री संघाच्या वतीने पुण्यानुमोदन पारना समारंभ होत होता. यावेळी तपस्वी चा सत्कार करताना तपस्या च्या बोलीने होत होता. कार्याध्यक्ष सागर सांखला यांनी या बोली बरोबरच दोन्ही परिवारांनी एक व्हावे म्हणून आवाहन केले. तपस्यार्थी सौ शितल या भोसरीच्या फिरोदिया परिवाराच्या सुनबाई. हा परिवार वाडेगव्हाण, ता. पारनेर येथून सुमारे ५० वर्षांपासून भोसरीत स्थायीक आहेत .

चंदन प्रोव्हिजन ह्या नावाने किराणा व्यवसाय . श्री चंदनमल जी फिरोदिया करीत आहेत. याच कालावधीत फिरोदिया, कटारिया व गांधी या परिवाराचे मामाजी व जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष सुभाषजी चुत्तर हेही उपजिवीकेसाठी ४२ वर्षांपासून भोसरीत स्थायिक आहेत. आदिनाथ प्रोव्हिजन स्टोअर्स नावाने किराणा व्यवसाय आळंदी रोड येथे करीत आहेत.

भोसरी गावात मामाजी या नावाने सुपरिचीत असणारे सुभाषजी व त्यांचे मेहुणे चंदनमलजी फिरोदिया या परिवारातील प्रमुखांमध्ये गेल्या बावीस – तेवीस वर्षांपासून अबोला होता. कोणताही वादविवाद नव्हता. पण बोला चाली बंद होती ही गोष्ट माहीत होताच श्री संघ अध्यक्ष राजेंद्र बाठीया, सागर सांकला, राजेंद्र चोरडीया, कचरदास गांधी, हस्तीमलजी गुगळे, बाळासाहेब कटारिया, सुभाष डुंगरवाल, संजय भंडारी, गिरीष मुथियान ,डॉ. प्रदीप गांधी, डॉ. अलका जवाहरलाल भळगट आदींनी पुढाकार घेऊन या परिवारामध्ये गोडवा निर्माण केला. जिलेबी चा गोड घास भरून दोन्ही परिवार एकत्र केले.

सुनबाई च्या उपवास पारणा समारंभात साध्वी डॉ. सुशील महाराज व गावातील पंच यांनी केलेली विनंती हा आदेश आनंदाने स्वीकारला यावर्षीच्या चातुर्मासाची सर्वात मोठी ही भेट आहे .

                                     -सुभाषजी चुत्तर माजी अध्यक्ष जैन श्रावक संघ भोसरी

तप आराधना शरीरासाठी गरजेची असते. त्याचप्रमाणे समाजातील एकजूट ही तेवढीच महत्त्वाची आहे. समाज गाव यांची एकजूट महत्वाची आहे. ही साधने म्हणजेच चातुर्मासाची फलश्रुती आहे. घराघरात एकी व्हावी सर्व आनंदाने नांदावेत हाच विचार सर्व साधुसंतांचा असतो.
                                                           –   जैन साध्वी डॉक्टर सुशील जीमहाराज

Back to top button