श्री खंडोबा बाणाई विवाह सोहळा | पुढारी

श्री खंडोबा बाणाई विवाह सोहळा

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : श्रावणी पौर्णिमेला श्री खंडोबा व बाणाई देवीचा विवाह सोहळा नळदुर्ग येथे येथे पार पडला. ही प्रथा जेजुरीच्या खंडोबा मंदिरात परंपरेने सुरू आहे. गुरुवारी (दि. 11) श्रावणी पौर्णिमेनिमित्त पहाटे जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात पुजारी सेवक वर्ग व नित्य सेवेकरी यानी श्री खंडोबा व बाणाई देवीचा विवाह सोहळा धार्मिक पद्धतीने साजरा केला.

श्री खंडोबा व बाणाईदेवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरात देवाला पूजा अभिषेक घालून देवाला बाशिंग बांधण्यात आले. मंगलाष्टके होऊन देवाचा विवाह पार पडला. यावेळी सचिन उपाध्ये गुरुजी, नितीन बारभाई, नित्यसेवेकरी जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सोमनाथ उबाळे, पुजारी सेवक वर्ग आदी उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त महिलांनी खंडोबा देवाला राखी बांधली.

Back to top button