कात्रज घाटात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; पाठलागामुळे अपघाताचा धोका | पुढारी

कात्रज घाटात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; पाठलागामुळे अपघाताचा धोका

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कात्रज घाट रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही टोळकी दुचाकी व चारचाकी वाहनांचा पाठलाग करत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वाहनचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे शहराच्या विविध ठिकाणांहून भटके कुत्रे घाटात आणून सोडले जातात. कात्रज घाट रस्त्यालगत काही हॉटेलचालक शिल्लक अन्न टाकतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य वाढले आहे.

सध्या घाटातील या कुत्र्यांची संख्या अंदाजे 50 झाली आहे. या भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव वन विभागातील पशु-पक्ष्यांना होत आहे. कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे, घाटातील मोर, लांडोर, ससे, माकडे, रानडुक्कर अशा वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. घाटातील या गंभीर समस्येबाबत वन विभाग व मनपा प्रशासनाच्या श्वानपथकाने धडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील मांगडे यांच्यासह वाहनचालक व नागरिकांतून होत आहे.

Back to top button