चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार | पुढारी

चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : बांधकाम साईटवर नेऊन तिघांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना शुक्रवारी (दि. २७) रात्री चिंचवड परिसरात उघडकीस आली. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी खुनासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पिडीत मुलीच्या आईने याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत आहेत.

दरम्यान, मंगळवारी (दि. २४) दुपारी दोनच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून मुलीला बंद असलेल्या बांधकाम साईटवर नेले. तेथे तिला व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तसेच, सेक्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिला झालेल्या प्रकराची वाच्यता न करण्यासाठी दम दिला.

मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघांपैकी दोघेजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, चोरी, जबरी चोरी, घरात घुसून विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

घटनेनंतर मुलगी घाबरली असल्याने ती तक्रार देण्यास तयार नव्हती. मात्र, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तिला धीर देत तक्रार देण्यास संगितले. त्यानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

Back to top button