चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : बांधकाम साईटवर नेऊन तिघांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना शुक्रवारी (दि. २७) रात्री चिंचवड परिसरात उघडकीस आली. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी खुनासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पिडीत मुलीच्या आईने याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नारायण राणेंना उदय सामंतांचा इशारा, जशी ॲक्शन तशी रिॲक्शन येईल
- भविनाबेन पटेल हिने टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक केले निश्चित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत आहेत.
दरम्यान, मंगळवारी (दि. २४) दुपारी दोनच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून मुलीला बंद असलेल्या बांधकाम साईटवर नेले. तेथे तिला व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
- ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मी इन्स्टंट कॉफी पीत नाही’
- देवमाणूस : डॉक्टरला शिव्याशाप देणाऱ्या सरु आजीची ‘पडद्यामागील कहाणी’
तसेच, सेक्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिला झालेल्या प्रकराची वाच्यता न करण्यासाठी दम दिला.
मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघांपैकी दोघेजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, चोरी, जबरी चोरी, घरात घुसून विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
घटनेनंतर मुलगी घाबरली असल्याने ती तक्रार देण्यास तयार नव्हती. मात्र, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तिला धीर देत तक्रार देण्यास संगितले. त्यानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.
- अतिवृष्टी मदत : कोल्हापूर जिल्ह्यातील मागील वर्षीची अतिवृष्टी मदत हवेतच!
- bhagyashree : भाग्यश्रीच्या सौंदर्यापुढे नव्या अभिनेत्री पडल्या फिक्या (Video)
- स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष : मुख्यमंत्र्यांना भाजप पाठवणार ७५ हजार पत्रे
- कोण होणार करोडपती : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी-लेफ्टनंट कनिका राणे यांची एंट्री