वाकडमधील धोकादायक डीपी हटवा | पुढारी

वाकडमधील धोकादायक डीपी हटवा

वाकड : वाकड- हिंजवडी रस्ता परिसरात महावितरणचा डीपी उघड्या अवस्थेत असून, त्यामुळे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हा डीपी दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.  भामा परल सोसायटी शेजारी डीपीची बॉक्स तुटलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यामध्ये शॉर्टसर्किट होण्याचा धोका आहे. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणार्‍या नागरिकांना धोका उद्भवू शकतो.

वाकडहून हिंजवडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या मधोमध हा डीपी असून पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे; मात्र या डीपीमधून विद्युत वायर बाहेर आलेल्या आहेत. हा रस्ता कायमचा रहदारीचा असून, उघड्या वायरींमुळे एखाद्यास विजेचा धक्का बसून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या डीपी शेजारुन लहान मुले खेळत असतात. डीपी शेजारी अनेक दुकाने असून या रस्त्यावर कायम रहदारी आहे.

Back to top button