वाकड : काळेवाडी उड्डाणपुलाखाली कचर्‍याचे साम्राज्य | पुढारी

वाकड : काळेवाडी उड्डाणपुलाखाली कचर्‍याचे साम्राज्य

वाकड : काळेवाडी उड्डाणपुलाखाली जागोजागी कचरा पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काळेवाडी फाटा उड्डाणपुलाखाली पीएमपीचा थांबा आहे. बसमधून उतरल्यानंतर नागरिकांना या अंडरपासमधून जावे लागते. येथे परिसरातील नागरिक कचरा आणून टाकत असल्यामुळे परिसरात इतस्तत: कचरा पसरला आहे.

तसेच या अंडरपासमधून दुचाकी वाहने ये-जा करू नये म्हणून खांब लावलेले असून, त्यामधील एक खांब निखळून पडला आहे. त्यामुळे या मार्गातून अनेक दुचाकीस्वार आपली वाहने नेताना आढळतात. वेळ वाचवण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालून त्या अंडरपास ब्रिज खालून नागरिक आपल्या टू व्हीलर घेऊन ये जा करीत असतात. हा बीआरटी रोड असून एखाद्यावेळी दुचाकीस्वार आणि बसचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनर्थ होण्यापूर्वी महापालिकेने याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Back to top button