निगडीतील एकाची 16 लाखांची फसवणूक | पुढारी

निगडीतील एकाची 16 लाखांची फसवणूक

पिंपरी : पाच वर्षांत दामदुप्पट करण्याच्या आमिषाने एकाची पंधरा लाख 75 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना नोव्हेंबर 2007 ते 9 ऑगस्ट 2022 दरम्यान परिवार सोसायटी, निगडी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी बिनॉय अब्दुल करीम जाफर (42, रा. परिवार सोसायटी, प्राधिकरण, निगडी) यांनी मंगळवारी (दि. 9) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टी.पी अलेक्झांडर (वय 82), रॉबिन अलेक्झांडर (वय 49, दोघेही रा. भैरवनगर, धानोरी रोड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या वडिलांना पाच वर्षात दाम दुप्पट किंवा पाच एकर जमीन तुमच्या नावावर करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्या वडिलांकडून पंधरा लाख 75 हजार रुपये घेतले. दरम्यान, पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी मोबदला किंवा जमीन न देता फिर्यादी यांच्या वडिलांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button