कात्रज : विद्यार्थिनींतर्फे सैनिकांना राख्या | पुढारी

कात्रज : विद्यार्थिनींतर्फे सैनिकांना राख्या

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: ‘देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी दत्तनगर येथील श्रीचक्रधर परमानंद शिक्षण संस्थेच्या श्रीचक्रधर विद्यामंदिर प्राथमिक शाळेमधील विद्यार्थिनींनी राख्या तयार केल्या. तयार केलेल्या राख्या या सीमेवर पाठविण्यात आल्या आहेत. या अभिनव उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत शाळेमधील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी आकर्षक राख्या तयार केल्या.

देशाच्या सीमांचे रक्षण स्वतः प्राणांची बाजी लावून करणार्‍या सैनिकांप्रती आदराची व कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे सचिव महेंद्र कोंढरे यांनी दिली. श्रीचक्रधर परमानंद शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा मेघा कोंढरे, मुख्याध्यापक विश्वास कोचळे तसेच शाळेमधील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Back to top button