शेळगाव शिवसेना शाखा प्रमुखाची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

शेळगाव शिवसेना शाखा प्रमुखाची गळफास घेऊन आत्महत्या

शेळगाव, पुढारी वृत्तसेवा: शेळगाव (ता. इंदापूर) शिवसेना शाखाप्रमुख पदावर असलेले सुरेश बनकर (वय ४८) यांनी माळीवस्ती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळगाव येथील सुरेश बनकर यांनी बुधवारी १० ऑगस्ट रोजी राहत्या घरी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्मह्त्या केल्याचे उघड झाले आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नसून पुढील तपास वालचंदनगरचे पोलिस करीत आहेत. सुरेश बनकर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ भावजाया असा परिवार आहे.

Back to top button