Pune Crime : पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार | पुढारी

Pune Crime : पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Pune Crime) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पुणे येथील दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे या घटनेला वाचा फुटली. (Pune Crime)

घरातून एका तरुणीच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे गल्लीतील लोकांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना फोन केला. ही घटना जनता वसाहतीत शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. पीडित तरूणीला मानसिक आजार असल्याचे समजते.

श्रीकांत सरोदे (वय ३६), आदित्य ऊर्फ सन्या पवार (वय १९), सुर्वेश जाधव (वय ३६) आणि आशिष मोहिते (वय १८, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, पीडित २५ वर्षाची तरुणी भारती विद्यापीठ परिसरात राहते. ही तरुणी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेटवरुन घरी जात होती.

यावेळी आरोपींपैकी एकाने तिची ओळख काढून जनता वसाहतीत आणले. त्यानंतर त्याने इतरांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.

हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्‍यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button