पिंपरी : कोरोना रुग्णसंख्या आली 50 च्या आत | पुढारी

पिंपरी : कोरोना रुग्णसंख्या आली 50 च्या आत

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: शहरातील कोरोना बाधित रुग्ण घटले आहेत. बाधितांची रुग्णसंख्या 50 च्या आत आली आहे. आज दिवसभरात 41 बाधित रुग्ण आढळले. शहरामध्ये गेल्या आठवडाभरापूर्वी म्हणजे 1 ऑगस्टला 54 बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर ही रुग्णसंख्या वाढत शंभर रुग्णांच्या पुढे गेली. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा घटू लागली आहे.

6 तारखेला 130 बाधित रुग्ण आढळले होते. तर, 7 आणि 8 तारखेला अनुक्रमे 80 आणि 41 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 27 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 685 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. आज दिवसभरात 645 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. आज दिवसभरात 199 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले.
कोरोना रुग्णांचा आठवड्याचा आलेख

दिनांक बाधित बरे रुग्ण
1 54 72
2 143 144
3 114 160
4 86 145
5 118 147
6 130 147
7 80 139
8 41 54
एकूण 766 1008

Back to top button