पिंपरी : महिलेचा विनयभंग, एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला | पुढारी

पिंपरी : महिलेचा विनयभंग, एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

पिंपरी : घरासमोर कपडे वाळत घालत असलेल्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार (दि. 6) रा. चिखली येथील मोरेवस्तीमध्ये घडली आहे. विश्वनाथ शंकर भोसले (वय 52, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या घरासमोर राहतात. फिर्यादी त्यांच्या घरासमोर काम करत असताना आरोपी त्याच्या घराच्या दारात आला. त्याने फिर्यादीकडे पाहून अश्लील हावभाव करून त्यांचा विनयभंग केला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button