चेंबरच्या कामामुळे दापोडीत अपघाताची भीती | पुढारी

चेंबरच्या कामामुळे दापोडीत अपघाताची भीती

दापोडी : येथील शितळादेवी चौकात ड्रेनेज चेंबरचे काम सुरू असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्यावतीने परिसरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे कामे करत असताना ड्रेनेजची काम करणे ही गरजेचे आहे. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे पुन्हा पुन्हा तेच काम करावे लागत आहे.

एकाच चेंबरचे काम वारंवार सुरू असल्यामुळे या चेंबरजवळ बॅरिकेट लावून ठेवले आहेत. त्यामुळे भरधाव येणार्‍या वाहनचालकांना अचानक ब्रेक दाबावे लागत आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, चेंबर रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. संबंधित विभागाने या गोष्टीकडे लक्ष देवून त्वरित चेंबरचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक लक्ष्मीकांत बाराथे यांनी केली आहे

Back to top button