दहावी, बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर | पुढारी

दहावी, बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावी बारावी पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरुपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करुन, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकोल जाहीर करण्यात आला.

मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे.

या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालवधीत होणार आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम घेउन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

 

पुरवणी परीक्षेला कमी विद्यार्थी प्रविष्ठ होतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित नियम पाळून या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेणे शक्य आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेची तयारी करावी.
– डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Back to top button