गणेशोत्सवासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार : अजित पवार | पुढारी

गणेशोत्सवासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार : अजित पवार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्ग असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाही दहीहंडी सण साजरा करण्यास मनाई असल्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दहीहंडीचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर झाला आहे. गणेशोत्सवाबाबतही निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. याचबरोबर तिसऱ्या लाटेच्या आधीच लसीकरण करण्यासाठी सिरम संस्थेबरोबर बोलणे सुरू आहे. आदर पूनावाला पुण्यात आल्यानंतर पुन्हा बोलणार आहे ते मदत करायला तयार असल्याचे पवार यांनी म्हणाले.

एस टी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये

दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. ५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य सरकार पगाराची व्यवस्था करत आहे. तसा निर्णय ही झाला आहे.

राज्यसरकार वेगळ्या संकटातून जात काही दिवसांनी सगळं ठिक होईल असे पवार म्हणाले.

राज्यात विरोधक जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत यावर पवार म्हणाले सगळ्यांना निर्णय समान आहे ज्या भागात कोरोनाचे नियम डावलून गर्दी होईल तिथं गुन्हे दाखल होणार आहेत. गुन्ह्याची तीव्रता कमी असल्याने लोकांना भीती वाटत नाही.

महापालिका निवडणुका

आम्ही कुठेही चर्चा न करता आमच्या नावाची चर्चा होत आहे. सरकार बैठक घेऊन निर्णय घेणार आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेत एक प्रभाग निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक होणार असून अंतिम निर्णय अजून झालेला नाही. निवडणुकांबाबत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची बैठक झाली.

सर्व पक्षीय गटनेते देखील होते सगळे सहमत आहे. ओबीसींवर झालेला अन्याय जो पर्यंत दूर होणार नाही तो पर्यंत निवडणूक होणार नाही.

यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे. याबाबतही पुढल्या आठवड्यात बैठक होणार आहे.

Back to top button