पिंपरी : ‘फ्रेंडशिप शिप डे’ची जय्यत तयारी | पुढारी

पिंपरी : 'फ्रेंडशिप शिप डे’ची जय्यत तयारी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शहरातील युवकवर्गात ‘फ्रेंडशिप डे’ च्या सेलिब्रेशनची तयारी जोरदार सुरू असून, शहरातील गिफ्ट शॉपीमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दोन वर्षानंतर महाविद्यालये व शाळा ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ जरा हटकेच असणार आहे. ‘फ्रेंडशिप डे’निमित्त आकर्षक ‘फ्रेंडशिप डे’ बँड, शुभेच्छापत्रांनी गिफ्ट शॉपी सजल्या आहेत. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्यानंतर मैत्री व्यक्त करण्यासाठी तरुणाईला ‘फ्रेंडशिप डे’ चे वेध असतात. आवडत्या मित्र-मैत्रिणीला मैत्री दिनाच्या शुभेच्छा आणि मैत्रीच्या धाग्यात गुंफण्यासाठी विविध प्रकारचे ‘फ्रेंडशिप डे’ बँड दुकानात उपलब्ध आहेत. जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा व नवीन मैत्रीचे स्वागत या दिवशी केले जाते. महाविद्यालयांसह शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनीही एकमेकांच्या हातात‘फ्रेंडशिप डे’ बँड बांधून साजरा करतात.

नावीन्यपूर्ण फ्रेंडशिप बँड
बाजारात विविध प्रकारचे बँड विक्रीसाठी आले आहेत. मण्यांमध्ये ‘फ्रेंड’ असे अक्षर लिहिलेले, रबरी बँड, दोर्‍यात गुंफलेले फॉरेवर ‘फ्रेंड’चे बँड, लहानांना आकर्षित करणारे विविधरंगी बँड, चमकणारे बँडही दुकानात उपलब्ध आहेत. तसेच यंदा बांगडीसारखे विविधरंगी बँडही आले आहेत. हे मुलींना देण्यासाठी उत्तम प्रकार आहे. तसेच डेनिम लूक देणारे रबरी आणि लेदरसारखे बँडही बाजारात भाव खात आहेत. हे बँड 10 ते 15 रुपयांना उपलब्ध आहेत. नावीन्यपूर्ण ‘फ्रेंडशिप  बँड, खड्याचे ब्रेसलेट , मण्यांचे ब्रेसलेट बाजारात दिसून येत आहेत. ‘फ्रेंडशिप  अंगठ्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे.

भेटकार्ड, टेडी बेअर
‘फ्रेंडशिप डे’ रिबन बांधणे, मैत्रीचा संदेश देणारी भेटकार्ड देणे, एवढेच नव्हे, तर फ्रेंडशिपचे प्रतीक असलेली टेडी बेअर मित्रांना गिफ्ट दिल्याशिवाय तरुणाईचा फ्रेंडशिप डे साजराच होत नाही. तसेच फ्रेंडशिप चॉकलेट्स, चॉकलेट बटवे तरुणाचे लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षकपणे या चॉकलेटची सजावट केली आहे. नवनवीन भेटकार्डांना आजही पसंती दिली जाते. दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंतची भेटकार्डे बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय आकर्षक फोटोफ्रेम , मैत्रीदिनाच्या भावना व्यक्त करणारे भेटकार्ड, टेडी, चॉकलेट बुके
गिफ्ट गॅलरीत विक्रीसाठी विविध प्रकारात दिसून येत आहेत.

Back to top button