पिंपरी : दोन गटांत हाणामारी; टोळक्यावर गुन्हा | पुढारी

पिंपरी : दोन गटांत हाणामारी; टोळक्यावर गुन्हा

पिंपरी : दोन गटाने आपसांत हाणामारी करीत परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी कांबळेवस्ती, बावधन खुर्द येथे घडली. ईश्वर खंडूलाल चव्हाण (19, रा. कोथरूड), पियुष सतीश जाधव (19, रा. वारजे), अभिषेक रोहिदास जाधव (20, रा. कोथरूड), मल्लेश शरणआप्पा म्हेत्रे (22, रा. बावधन), सौरभ नितीन आदमाने (19, रा. बावधन), अमिर इमाम शेख (19, रा. वारजे), शिवराज शरद फातरे (19, रा. वारजे), रोहित हनुमंत शिंदे (20, रा. बावधन) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्यासह ओंकार जाधव, प्रीतम नलावडे, तन्मय विटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आबासाहेब सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये बुधवारी भांडण झाले होते. त्या कारणावरून गुरुवारी दुपारी आरोपी एकमेकांना मारहाण करण्याच्या उद्देशाने हातात कोयते घेऊन आले. कोयत्याने एकमेकांवर वार करून दहशत निर्माण केली. यामध्ये 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात त्याने फिर्याद दिली. त्यानुसार, मल्लेश म्हेत्रे, सौरभ आदमाने, आमिर शेख, शिवराज कातरे आणि एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button