वाकड परिसरात पाणीगळती

वाकड : पुढारी वृत्तसेवा : येथील चौधरी पार्क पोलिस लाईन येथे पाणीपुरवठा व्हॉल्व्हमधून पाणी गळती होत असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक मागणी करत आहेत. पाइपलाइनच्या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आहे. तसेच, यामध्ये खराब पाणीही मिसळत असल्यामुळे नागरिकांमध्ये पोटाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यामुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांना या खराब पाण्यामुळे गॅस्ट्रोसारख्या आजाराला आमंत्रण देण्यात येत आहे. तसेच, रस्त्यावर पाणी जमा होत असल्यामुळे चालकांना वाहन चालविना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे लोकांना चालणेही कठीण होऊन बसले आहे. पाणी अंगावर उडत असल्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे लवकरात लकवर पाइपलाइन दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version