‘त्या’ नराधमाचे वकीलपत्र कोणीही घेणार नाही, वडगाव मावळ वकील बार असोसिएशनचा निर्णय

‘त्या’ नराधमाचे वकीलपत्र कोणीही घेणार नाही, वडगाव मावळ वकील बार असोसिएशनचा निर्णय
Published on
Updated on

वडगाव मावळ : कोथुर्णे येथे घडलेल्या सातवर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणातील नराधम आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय वडगाव मावळ बार असोसिएशनने घेतला आहे. या दुर्दैवी प्रकारचा वकील बारच्या वतीनेही निषेध करून वडगाव न्यायालयात कार्यरत असणार्‍या वकीलांपैकी एकही वकील संबंधित नराधम आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणार नाही, असा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. हे नीच कृत्य करणार्‍या नराधमाला फाशीच व्हावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

या घटनेतील सर्व साक्षी पुरावे व तांत्रिक तपास योग्य पद्घतीने पूर्ण करत लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची रिपाइंची मागणी

वडगाव मावळ : कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्याच्या कृत्याच्या निषेध व्यक्त करून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मावळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने (आठवले) करण्यात आली आहे.
याबाबत तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, जिल्हा संपर्कप्रमुख समीर जाधव, युवक अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष अशोक केदारी, कामशेत अध्यक्ष नितीन ओव्हाळ यांसह अन्य पदाधिकार्‍यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले आहे.

पवनानगर येथे विद्यार्थ्यांची रॅली

येलसे : कोथुर्णे घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पवनानगर येथे शुक्रवारी विद्यार्थ्यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. पवना विद्या मंदिर, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, पवनानगर येथील ग्रामसचिवालय ते बाजारपेठ विद्यार्थ्यांनी रॅली काढून व काळ्या फीती लावून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी काले पवनानगर ग्रामपंचायतीचे सरपंच खंडु कालेकर, उपसरपंच अमित कुंभार, प्राचार्या अंजली दौंडे, संजय मोहोळ, हनुमंत गोणते यांच्यसह पालक, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तळेगाव स्टेशन येथे मूक मोर्चा
तळेगाव स्टेशन : कोथुर्णे गावातील सातवर्षीय चिमुकलीची हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी तळेगाव स्टेशन भागातील मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी व जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण

वडगावमध्ये कँडल मार्च
वडगाव मावळ : कोथुर्णे येथील दुर्दैवी घटनेतील अमानवी कृत्य करणार्‍या नराधमाला कडक शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी वडगाव मावळ येथील मोरया महिला प्रतिष्ठान, मोरया ढोल पथक व शहरवासीयांच्यावतीने कॅन्डल मार्च काढून निषेध करण्यात आला. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, पुनम जाधव आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य, मोरया ढोल पथकाचे सदस्य, नागरिक उपस्थित होते. या वेळी चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगराध्यक्ष ढोरे म्हणाले, की या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी केस जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी.

बजरंग दलाच्या वतीने उद्या उपोषण
वडगाव मावळ : तालक्यातील कोथुर्णे गावातील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने पवनानगर येथील चौकात रविवारपासून (दि. 7) उपोषण करण्यात येणार आहे. कोथुर्णे येथील सात वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार चाटे यांना देण्यात आले. या वेळी बाळासाहेब खांडभोर, अमोल पगडे, निलेश भेगडे, विभाग संयोजक संदेश भेगडे आदी उपस्थित होते.
करण्यात आली. या वेळी संदीप गोंदेगावे, देविदास टिळे, बाळासाहेब जामदार, सुप्रिया पारखे, जयश्री टिळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news