भोरच्या 38 ग्रामपंचायतींसाठी पावणेसहा कोटी; गटविकास अधिकारी स्नेहा देव यांची माहिती

भोर; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्यावतीने भोर तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींच्या बांधकामासाठी एकूण 5 कोटी 70 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी 15 लाख रुपयांप्रमाणे मंजूरी पत्र संबंधित ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्याकडे देण्यात आली आहेत. पहिल्या टप्पात ग्रामपंचायतीच्या खात्यावर प्रत्येकी 6 लाख रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी स्नेहा देव यांनी दिली. स्वः निधी 2022-23 अंतर्गत आर. आर. (आबा) पाटील ग्रामसचिवालय बांधणे योजनेनुसार हा निधी मंजुर करण्यात आला आहे.

भोर पंचायत सामितीतीत गुरुवार देव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी कार्यकारी अभियंता (उत्तर विभाग ) प्रदिप माने, विस्तार अधिकारी राजेंद्र चांदगुडे , उपभियंता विकास कुलकर्णी, शाखाभियंता आय एल शेख आदी उपस्थित होते. या वेळी काही ग्रामपंचायतीना ग्रामसचिवालयाची अंदाजपत्रक मंजुरी पत्रे देण्यात आली.

निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायती
कांबर बु , कोढरी, वेणूपूरी अंगसुळे आंबवडे, आंबाडे, साळव, साळुंगण, आशिंपी, विरवाडी, ब—ाम्हणघर, दिवळे, गवडी, म्हाकोशी, नर्हे, गुहिणी, पन्हर खुर्द, करंजगाव, नांद, खोपी कासुर्डी खेबा, नाटबी, मोहरी बु ,कोळवडी, पसुरे, दापकेघर, शिरगाव, शिंदेवाडी, शिरवली हिमा ससेवाडी, सांगवी भिडे, वेळू, वारवंड, कारूंगण, वर्वे बु, डेहेण – कोंडगाव, दुर्गाडी, किवत.

ग्रामसचिवालयाचे बांधकाम येत्या 31 डिसेंबरपर्यंत होणे अपेक्षित आहे. लोकवर्गणी, सौर ऊर्जेचा वापर आणि हरित पर्यावरण इमारतीची उभारणी करणार्‍या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांक 1 लाख, व्दितीय 75 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे बक्षिस देणार आहे.
                                                                          स्नेहा देव, गटविकास अधिकारी

Exit mobile version