पिंपरी : शटर उचकटून 2 लाखांची चोरी | पुढारी

पिंपरी : शटर उचकटून 2 लाखांची चोरी

पिंपरी : कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी लेणेकर इंडस्ट्रीज कंपनी, तळवडे येथे उघडकीस आली. मुकुंद बळवंतराव लेणेकर (38, रा. चिखली) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांची तळवडे येथे लेणेकर इंडस्ट्रीज नावाने कंपनी आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून कंपनीतून फोर्जिंग डाई, रोलिंग डाई, ब्लोर मशीन, ड्रिल मशीन, फिनिश गुड्स, लेथ मशीन असा एकूण दोन लाख 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 

Back to top button