पिंपरी : फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरवर गुन्हा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्यामुळे बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार नोव्हेंबर 2012 ते ऑगस्ट 2022 दरम्यान दत्तवाडी, नेरे, हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी निशित बिरजा पटनायक (35, रा. एक्झबिर्या टाऊनशिप, नेरे, दत्तवाडी) यांनी 2 ऑगस्ट रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एक्झबिर्या टाऊनशिपचे विकासक आणि संबंधित पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना फ्लॅट बुक करतेवेळी विश्वासात घेऊन सोयी-सुविधा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आजतागायत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. तसेच, संतोष बाबुराव पाटील, संदीप दीनदयाळ सिंग, अजिंक्य अरविंद घोडके, दीपाप्रकाश देशमुख या पाच जणांना ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

Back to top button