पिंपरी : रिक्षाच्या धडकेत पादचारी ठार | पुढारी

पिंपरी : रिक्षाच्या धडकेत पादचारी ठार

पिंपरी : भरधाव जाणार्‍या रिक्षाने धडक दिल्याने पादचारी ठार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी चापेकर चौक ते महावीर चौक रस्त्यावर घडली. बाळू शांताराम कोळेकर (55) असे मृत्यू झालेल्या पादचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी दशरथ बाळू कोळेकर (32, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, रिक्षाचालक संतोष सुखदेव बगाडे (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे वडील गुरुवारी सकाळी रस्त्याने चालले होते. दरम्यान, रस्ता ओलांडत असताना आरोपी चालवत असलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Back to top button