जुगार अड्ड्यावर छापा; 28 जणांवर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बालेवाडी गावातील दसरा चौक परिसरातील एका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी छापा टाकला. या वेळी रोकड, मोबाईल, जुगाराचे साहित्य, मोटारसायकल असा 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार अड्डामालक कमलेश ऊर्फ पिनूभाई भगवान ससाणे यांच्यासह जुगार खेळविणारे, खेळणारे अशा 28 जणांच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

Exit mobile version