भीमाशंकर : आश्रमशाळांतील मुलांना संसर्गजन्य आजार | पुढारी

भीमाशंकर : आश्रमशाळांतील मुलांना संसर्गजन्य आजार

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या 5 शासकीय आश्रमशाळांतील 70-80 मुले संसर्गजन्य आजाराने ग्रासली आहेत. गोहे शासकीय आश्रमशाळेतील 31 मुलांपैकी 11 मुलींना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (दि. 4) दुपारी दाखल केले. एकाच वेळी जास्त मुले आजारी पडल्याने गोहे आश्रमशाळेला 5 दिवस सुटी दिली आहे.

सध्या संसर्गजन्य थंडी, ताप, अंगदुखी या आजारांनी सगळीकडेच लोक ग्रासले आहेत. याचा फटका शासकीय आश्रमशाळेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यात गोहे, तेरुंगण, राजपूर, आसाणे व आहुपे यातील 70 ते 80 मुले थंडी, ताप व अंगदुखी आजारांनी ग्रासले आहेत. गोहे शासकीय आश्रमशाळेत 31 मुले आजाराने ग्रासली होती. त्यातील 11 मुलींना थंडी, ताप, अंगदुखी व श्वास घेण्यास जास्त त्रास होऊ लागल्याने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी दुपारी उपचारांसाठी दाखल
करण्यात आले.

Back to top button