चाकण : पाठलाग करून चोरट्यास पकडले | पुढारी

चाकण : पाठलाग करून चोरट्यास पकडले

चाकण : चाकणमध्ये रात्रीच्या वेळी मोबाईल चोरणार्‍यास पाठलाग करून पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अक्षय चौहान ( वय 24, सध्या रा. मेदनकरवाडी, ता खेड ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भुवेश महाले ( वय 23, रा. शिवणी ता. आमगाव जि.गोंदिया ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महाले बुधवारी (दि.3) रात्री चाकणकडून पुण्याकडे चालत जात होते. त्यावेळेस आरोपी चौहानने फिर्यादींचा मोबाईल हिसकावला. फिर्यादीने पाठलाग करून पकडून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Back to top button