जुन्नर : शासनाची पाटी लावल्याने गुन्हा | पुढारी

जुन्नर : शासनाची पाटी लावल्याने गुन्हा

जुन्नर : पतसंस्थेच्या खासगी वाहनावर वसुली अधिकार्‍याने महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून थकबाकी वसुली केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कुलस्वामी को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे वसुली अधिकारी हे संस्थेच्या खासगी वाहनाने बाळासाहेब ज्ञानदेव कोंडे (रा. धामणखेल, ता. जुन्नर) यांच्याकडे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी 5 फेब्रुवारी 2021 रोजी गेले होते. या वेळी त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी होती. तसेच सदर अधिकार्‍यांनी रक्कम भरणेबाबत दमदाटी केली, असे कोंडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, कोंडे हे एका थकीत कर्ज प्रकरणात मुंबई शाखेत जामीनदार होते व कर्जदाराने रक्कम नियमित न भरल्यामुळे बँकेने त्यांना नोटीस बजावली होती, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. याबाबत कोंडे यांनी जुन्नर न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

Back to top button