पिंपरी : पावणेचार लाखांची फसवणूक | पुढारी

पिंपरी : पावणेचार लाखांची फसवणूक

पिंपरी : नोकरीच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलावून चोरट्याने मोबाइल चोरून नेला. त्यानंतर ऑनलाइन बँकिंगद्वारे पावणेचार लाखांची फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि. 2) बावधन, पुणे येथे घडली. अमरेंद्र मुरलीधर कुलकर्णी (54, रा. कोथरूड, पुणे) यांनी बुधवारी (दि. 3) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, प्रवीण माथूर आणि त्याचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी नोकरीची जाहिरात देऊन फिर्यादी कुलकर्णी यांना चांदणी चौक, बावधन येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलाखतीसाठी बोलविले. त्यानंतर आरोपी माथुरसोबत असलेल्या दुसर्‍या आरोपीने कुलकर्णी यांचा मोबाइल घेऊन गेला. त्यानंतर मोबाइलवर ऑनलाइन व्यवहार करीत कुलकर्णी यांची तीन लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली.

Back to top button