पिंपरी : पावणेसहा लाखांच्या ऐवजाची चोरी | पुढारी

पिंपरी : पावणेसहा लाखांच्या ऐवजाची चोरी

पिंपरी : खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरातील पाच लाख 88 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना थेरगाव येथे बुधवारी (दि. 3) दुपारी उघडकीस आली. अजित महादेव कदम (21, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) यांनी बुधवारी (दि. 3) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कदम यांचे घर 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान कुलूप लावून बंद होते. या कालावधीत चोरट्याने फिर्यादी यांच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. घरातील दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि साडेतीन लाख रुपयांची रोकड,असा एकूण पाच लाख 88 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तपास वाकड पोलिस करीत आहेत.

Back to top button