पिंपरी : कापडी तिरंगा पोस्टात उपलब्ध | पुढारी

पिंपरी : कापडी तिरंगा पोस्टात उपलब्ध

पिंपरी : आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर घर मे तिरंगा’ घोषणा करण्यात आली आहे. त्याला अनुसरून पोस्ट खात्याने कापडी तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. गुरुवारी (दि.4) पहिल्याच दिवशी शहरातील 32 पोस्ट कार्यालयांमधून साडेतीन हजाराहून अधिक कापडी तिरंगा झेंड्याची विक्री झाली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोस्ट खात्याने कापडी तिरंगा उपलब्ध केला आहे प्रत्येक पोस्ट कार्यालयात हा तिरंगा विकला जात असून त्याची किंमत 25 रुपये आहे शहरात 32 पोस्ट कार्यालय असून पहिल्याच दिवशी सहा हजार सहाशे कापडी तिरंगा झेंडे विक्रीसाठी उपलब्ध झाले त्यापैकी साडेतीन हजाराहून अधिक तिरंगा विक्री झाल्याची माहिती पोस्टाचे जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी यांनी दिली.

Back to top button