राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंचवडला उद्या मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंचवडला उद्या मेळावा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत 'निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा' हा मेळावा शनिवारी (दि.6) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोेरे प्रेक्षागृहात दुपारी दोनला आयोजित केला आहे. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गुरूवारी (दि.4) दिली.

गव्हाणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता वैतागली आहे. येत्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलटवून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग पालिकेच्या निवडणुका कधीही घोषित करण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असून, पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी-माजी नगरसेवकांनी केला आहे. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी हाच पर्याय असल्याने जनतेचीही आम्हाला साथ मिळत आहे. पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणे व कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच महाविजयाचा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news