पिंपरी : विनापरवाना 92 झाडे तोडल्याने कंपनीला 46 लाखांचा दंड | पुढारी

पिंपरी : विनापरवाना 92 झाडे तोडल्याने कंपनीला 46 लाखांचा दंड

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा :  आकुर्डी येथील फॉरमायका कंपनीने विनापरवाना 90 झाडे तोडल्याने त्यांच्याकडून 45 लाखांचा आणि प्रभाकर न्यालकंठी यांनी विनापरवाना दोन झाडे तोडल्याने त्यांच्याकडून 1 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या उद्यान विभागाने केली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.3) दिली. शहरात महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंमलात आहे.

कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करण्या अगोदर उद्यान विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अनधिकृतपणे वृक्ष काढल्यास प्रत्येक वृक्षासाठी 50 हजार दंड आहे.फॉरमायका कंपनीने विनापरवाना 90 झाडे तोडल्याची तक्रार वृक्षप्रेमींने केली होती. त्यानुसार उद्यान विभागाने कंपनीस 45 लाख दंडाची नोटीस बजावली होती.

Back to top button