पुणे : तीन ठिकाणी घरफोड्या; 5 लाख 19 हजारांचा ऐवज चोरी | पुढारी

पुणे : तीन ठिकाणी घरफोड्या; 5 लाख 19 हजारांचा ऐवज चोरी

पुणे : बुधवार पेठ, लोणीकंद आणि हडपसर येथील ससाणेनगर येथे चोरट्यांनी घरफोड्या करून 5 लाख 19 हजारांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये हडपसर येथील घरफोडीत 4 लाख 42 हजारांचे 19 तोळे सोने चोरीला गेले. सावतामाळी भवन येथील गुरूप्रसाद असोसिएट्स येथून चोरट्यांनी शटर उचकटून 60 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी शंतनू शरद पवार (36, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली. मौजे लोणीकंदच्या हद्दीत राहणार्‍या आदित्य पार्क येथील प्रफुल्ल अंकुश घडवे (30, रा. ढगेवस्ती, वाघोली) यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील 17 हजारांची रोकड चोरून नेली. ससाणेनगर येथील चेतन हाईट्स येथील कृष्णा लिंगय्या आंबेती (55) यांची सदनिका फोडून 4 लाख 42 हजारांचा 19 तोळे सोन्याचा ऐवज चोरून नेला.

Back to top button