पुणे : जाब विचारला म्हणून तरुणीला मारहाण | पुढारी

पुणे : जाब विचारला म्हणून तरुणीला मारहाण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दुसर्‍या मुलीबरोबर लग्न केले. हा प्रकार पहिल्या तरुणीला समजल्यावर जाब विचारताच तिला शिवीगाळ करून मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर येथील 30 वर्षांच्या तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राहुल शिवानंद भगत (रा. वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल भगत याने फिर्यादी यांच्याशी ओळख निर्माण झाल्यावर लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर राहुल भगत याने दुसर्‍याच मुलीबरोबर लग्न केले. हे फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी जाब विचारला. तेव्हा त्याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच, फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सहायक पोलिस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.

Back to top button