कुरकुंभ: कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, सख्खी बहीण जखमी | पुढारी

कुरकुंभ: कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, सख्खी बहीण जखमी

कुरकुंभ, पुढारी वृत्तसेवा: कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत कंटेनरने स्कुटीला (दुचाकी) पाठीमागून जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणींपैकी एक बहिण ठार झाली, तर दुसरी किरकोळ जखमी झाली. याबाबत कंटेनर चालक सिदप्पा लक्ष्मण देवकाते (वय ५०, रा. राजुरी, जि. सोलापूर) याच्याविरुध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संजय ज्ञानदेव गबले (वय ४७, रा. झगडेवाडी पांढरेवाडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ हद्दीतील गिरीमेवस्ती येथे बुधवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता हा अपघात घडला.सारिका गोकुळ खोडवे (वय ३०, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि अहमदनगर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तसेच प्रियंका नवनाथ काळे असे जखमी महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका खोडवे आणि प्रियंका काळे या दोघी हिरो प्लेझर स्कुटी (एमएच १६ बीएस ०३५२)  या दुचाकीवरून जात होत्या. यादरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने (एनएल ०१ एडी ९१९४)  स्कुटीला पाठीमागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात प्रियंका यांना किरकोळ दुखापत झाली, तर सारिका यांना जबर दुखापत झाल्याने त्या मृत्युमुखी पडल्या. घटनेचा तपास पोलीस हवालदार एस. एम. शिंदे करीत आहेत.

Back to top button