पिंपरी : लग्नास नकार दिल्याने तरुणीची बदनामी | पुढारी

पिंपरी : लग्नास नकार दिल्याने तरुणीची बदनामी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून ओळख झालेल्या तरुणाला लग्नास नकार दिल्याने तरुणीची बदनामी केली. हा प्रकार मार्च ते जुलै 2022 या कालावधीत कृष्णानगर, पिंपरी आणि निगडी येथे घडला. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 2) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुणाल सिंग (रा. मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी कुणाल सोबत शादी डॉटकॉम या मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झाली. मात्र, दोघांच्या कुंडलीत दोष आढळल्याने फिर्यादी यांनी लग्नास नकार दिला. त्याचा राग आल्याने कुणाल याने फिर्यादी यांच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करीत धमकी दिली. फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने फिर्यादी यांचा इंस्टाग्रामवर पाठलाग केला. तसेच, फिर्यादी यांचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांना बदनामीकारक मेसेज पाठवले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button