लाच घेणार्‍या सर्व्हेअरला अटक | पुढारी

लाच घेणार्‍या सर्व्हेअरला अटक

पिंपरी : प्रतिनिधी : विकास योजनेचा अभिप्राय (डी.पी. ओपिनियन) देण्यासाठी तीन लाखांची लाच घेणार्‍या सर्व्हेअरला रंगेहात पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (दि.3) पिंपरी-चिंचवड महापालिका भवन येथे ही कारवाई केली. संदीप फकिरा लबडे (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर सर्व्हेअरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लबडे हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागररचना व विकास विभागात सर्व्हेअर पदावर नोकरीला आहे. दरम्यान, त्याने फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या विकास योजनेचा अभिप्राय देण्यासाठी साडेतीन लाखाची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंतर्गत तीन लाख रुपये देण्याचे ठरले.

याबाबत फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार, पथकाने बुधवारी पिंपरी चिंचवड महापालिका भवनात सापळा लावून लबडे याला अटक केली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपाधीक्षक क्रांती पवार तपास करीत

Back to top button